
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१५ वा दिवस
'मनुष्य' होणे हेच आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवे. तीच आपली एकमेव साधना आहे. विद्येचा अर्थ व्यर्थ अभिमान सोडा असा आहे. एखादा मतवाद कितीही उत्कृष्ट असला किंवा एखादा तर्क कितीही सूक्ष्म भेद स्पष्ट करणारा असला तरीही त्याचा काय उपयोग आहे? परमेश्वराची अनुभूती हेच आदर्श आपल्या जीवनाचे एकमेव साध्य आहे. ठाकूरांनी (श्रीरामकृष्णांनी) हेच आपल्याला सांगितले आहे आपण त्यांनी सांगितलेल्या आदर्श मार्गाचे अनुकरण करायला हवे. परमेश्वराच्या इच्छेमुळे मला ठाकुरांसारख्या महान व्यक्तीच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. जे एकीकडे पक्के द्वैतवादी होते तर दुसरीकडे ते तितकेच अद्वैतवादीही होते. एकीकडे ते परमभक्त होते तर दुसरीकडे ते परमज्ञानी देखील होते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २९ शके १९४७
★ चैत्र शुद्ध /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २० मार्च २०२६
★ स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अक्कलकोट
★ १७२७ गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडणारे, भौतिक शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ सर आयझेंक न्यूटन यांचा स्मृतिदिन.
★ १९१६ अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिध्दांत प्रसिद्ध केला.
★ १९२० मराठी साहित्यीक, नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्मदिन
१९५६ मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचा स्मृतीदिन
★ जागतिक चिमणी दिन.
