
नांदगाव : (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी नांदगाव व भालुर मंडळाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन हनुमान नगर येथील ॲड जयश्रीताई दौंड यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या बैठकीस उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. यतीनजी कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीच्या प्रारंभी मा. यतीनजी कदम यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून वातावरण उत्साहपूर्ण केले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत काकड सर यांनी केले.
राज्य परिषद सदस्या ॲड जयश्रीताई दौंड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचा विस्तार, बूथ रचना, तसेच पक्षाच्या ध्येय-धोरणांबाबत सविस्तर माहिती दिली. विविध संघटनात्मक विषयांवरही कार्यकर्त्यांना दिशा दिली. तसेच भाऊराव महाराज निकम यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी मा. यतीनजी कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या सातत्यपूर्ण यशामागे कार्यकर्त्यांचे नियमित प्रशिक्षण, संघटनात्मक शिस्त आणि पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा हा भक्कम पाया आहे. सक्षम व विचारसंपन्न कार्यकर्त्यांमुळेच पक्ष अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस मा. यतीनजी कदम व राज्य परिषद सदस्या ॲड जयश्रीताई दौंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड उमेश सरोदे यांनी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
ही आढावा बैठक भारतीय जनता पार्टी नांदगाव व भालुर मंडळाच्या वतीने यशस्वीरीत्या संपन्न झाली.
कार्यक्रमाला उपस्थित सौ. मनीषाताई काकड मंडळ अध्यक्ष भालूर ,गणेश शिंदे मा.तालुका अध्यक्ष, सतीश शिंदे महामंत्री, ताराबाई शर्मा, ता.उपाध्यक्ष , बबन मोरे डॉ. राजेंद्र आहेर ,संदीप पगार ,राजेंद्र गांगुर्डे, सुरेश कुमावत मनोज शर्मा जाधव सर जिल्हा परिषद सदस्य,,
भगवान सोनवणे,दादा बोरसे,
डॉ पुष्कर निकम ,शिवाजी सूर्यवंशी बबनराव नाईकवाडे, विवेक दौंड सोमनाथ घुगे ,नितीन चव्हाण कल्याण इनामदार, प्रशांत इनामदार निलेश इनामदार , शांताराम जाधव,अशोक आयनोर भारत काकड , रवी सानप ,संजय पटेल, अमरीन शेख अन्नपूर्णा जोशी वर्षा बचाटे , निलेश राठोड, परसराम सरोदे
किरण गवळी, अरुण पवार ,रमेश सरोदे चांगदेव वाघ ,शहाणू भालेकर पवन भालेकर, शब्बीर पटेल ,रवींद्र कवडे माधव काजळे, हिरालाल सानप, गणेश बचाटे ,अरुण जाधव रवींद्र सानप सुभाष मोरे ,वैभव पवार,गणेश शर्मा ,गीतांजली भिवराजे ,उषा चव्हाण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते
