
हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख मुजम्मील):
आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने आयोजित भव्य ‘दावत-ए-इफ्तार’ पार्टीत खुद्द आमदारांनीच पाठ फिरवल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवर मुख्य आयोजक म्हणून नाव असूनही आमदार अनुपस्थित राहिल्याने उपस्थित मुस्लिम बांधवांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती:
या प्रसंगी नगराध्यक्ष शेख रफीक, पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि पोलीस कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई,
मुजीब खान सरदार खान, समद खान,, अशरफ खान, असलम शेवालकर फेरोज खुरेशी अनवर खान आणि मसुद लाला यांसारख्या शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली.
नाराजीचे मुख्य मुद्दे:
बॅनरवर नाव, खुर्ची रिकामी: आमदारांच्या नावाचे मोठे बॅनर लागले होते, मात्र ऐन वेळी त्यांनी दांडी मारल्याने “आमदार साहेब मुस्लिम समाजावर नाराज आहेत का?” असा सवाल उपस्थित मान्यवरांकडून केला जात आहे.
राजकीय तर्क-वितर्क: पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नेत्यांनी उपस्थित राहून सलोखा राखण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुख्य आयोजकाच्या गैरहजेरीमुळे कार्यक्रमात नाराजीचे सावट दिसून आले.
उपस्थित होते.
अब्दुल मन्नान भाई पत्रकार यांनी कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले.
