
मखमलाबाद विद्यालयात सहकारमहर्षी पोपटराव पिंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक सहकारमहर्षी पोपटराव पिंगळे यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते, पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.प्राचार्य संजय डेर्ले यांनी सहकारमहर्षी पोपटराव पिंगळे यांच्या कार्यकर्त्तृत्वाचा आलेखच मांडला.

त्यांनी मखमलाबाद वि.का.स.सोसायटी,श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखमलाबाद व श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ या तीन संस्था स्थापन केल्या.तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशा विविध संस्थांवर संचालक,व्हा.चेअरमन व चेअरमन पदावर कार्यरत होते.त्यामध्ये महत्वाचे म्हणजे नाशिक सहकारी साखर कारखान्याचे व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पद भुषविलेले आहेत.त्यांच्या या सहकार क्षेत्रातील सक्रिय कार्याबद्दल नाशिक महानगरपालिकेने व नाशिक गोदावरी बँकेने “आदर्श सहकारी नेता” म्हणून बहुमान दिलेला होता.तसेच ते अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते.अशाप्रकारे त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,सहकार,राजकिय क्षेत्रातील कार्य हे अतिशय महान होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
