
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७० वा दिवस निःस्वार्थपणा हीच धर्माची सर्वोच्च कसोटी होय. जो जितका जास्त निःस्वार्थ तितका तो अधिक धार्मिक व शिवाच्या अधिक निकट असतो. एखाद्या स्वार्थी माणसाने झाडून साऱ्या मंदिरांचे उंबरठे झिजविले, साऱ्या तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या केल्या, स्वतःला चित्यासारखे आडव्या-उभ्या पट्ट्यांनी सजवले, भगवे वस्त्र परिधान केले, मस्तकी अष्टगंध वा भस्म लावले तरीही तो शिवापासून पुष्कळच दूर आहे असे समजावे. ‘परमात्मा सर्वव्यापक असून सर्वत्र समभावे विद्यमान आहे’ यामुळे स्वार्थी वृत्ती सोडून निःस्वार्थपणा अंगी बाणवा.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ चैत्र शके १९४७
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५
★ कामदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ १८५७ – १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे – यांना फाशी स्मृतीदिन
.★ १८९४ बंगाली कादंबरीकार, लेखक, कवी, पत्रकार, आनंदमठ या कादंबरीत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत रचणारे कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा स्मृतीदिन
★ १९५३ प्रसिध्द उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा स्मृतीदिन.


