
नांदगाव,दि. 7 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव तालुक्यात असलेल्या वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ PTR – F – 370 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक यांनी मागितलेली माहिती न दिल्यामुळे वडाळीभोई येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे गणेश भावलाल राऊत व योगेश माधव सानप यांच्यासह नागरिकांनी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सोमवारपासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक (ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ PTR – F -370) यांना गणेश भावलाल राऊत व योगेश माधव सानप यांनी दिलेल्या 29 मार्च 2025 रोजी दिलेल्या अर्जामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सदरील कमिटी संस्थेच्या आधारित असून सदरच्या माहिती अधिकार अर्ज सादर केला होता. या माहिती अधिकार अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी माहिती देणे टाळाटाळ करत आली. सदर माहिती दिनांक 2 एप्रिल 2025 च्या आत मिळाली नाही तर आम्ही समजून घेऊ की संस्थेच्या कामकाजात व कागदपत्रात गैर कारभार असल्याने आम्हाला माहिती देण्यास उशीर करण्यात येत आहे. त्यामुळे दिनांक सात एप्रिल 2025 रोजी सोमवारपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक येथील शाळेसमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे. सदरच्या अर्जाच्या निवेदनाच्या प्रती नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, पोलीस स्टेशन नांदगाव, गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव, तहशील कार्यालय नांदगाव, माननीय शिक्षण मंत्री, पोलीस पाटील वडाळी बुद्रुक यांना देण्यात आले आहेत. गणेश भावलाल राऊत यांनी मुख्याध्यापक माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक यांना दिलेल्या माहिती अधिकार अर्जात जानेवारी 2016 ते 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत शालेय व्यवस्थापन समितीच्या मीटिंगच्या ठरावचा नकला, शालेय पोषण आहार रोजीचे रजिस्टर, शालेय व्यवस्थापन समितीची निवड कशा पद्धतीने केली जाते, संस्थेचे संचालक मंडळ कशा पद्धतीचे आहे, एकूण किती समित्या आहेत.व त्यावर कोणते संचालक आहेत याची लेखी माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला. मात्र सदरची माहिती न दिल्यामुळे गणेश भावलाल राऊत, योगेश माधव सानप आदींसह गावातील काही नागरिकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक येथे शाळेसमोर बेमुदत अमर उपोषणास बसले आहेत.
