
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
महादेव प्रतिष्ठान, नाशिक संचलित एंजल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाडीवऱ्हे येथे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड तर्फे आयोजित जनरल नॉलेज एक्झाम 2026 मध्ये शाळेतील तब्बल 20 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना कंपनीच्या CSR फंडामधून सर्व विद्यार्थ्यांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच उद्योजक श्री. सुनील ललवाणी यांनी विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासाठी एक संगणक भेट दिला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड चे सीनियर मॅनेजर, श्री. राहुल कळमकर , उद्योजक श्री. सुनील ललवाणी, व अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय संरक्षक श्री. भुवाल सिंह उपस्थित होते.
यावेळी शाळेचे संचालक श्री. अतुल आचळे सर , ऍड. प्रमोद गुप्ता सर , श्री. अतुल पांडे सर , प्राचार्य श्री. बहिरु गायकर सर , शाळेच्या पालक शिक्षक समितीचे सदस्य, व पालक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना मार्गदर्शन केले. श्री. राहुल कळमकर यांनी प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर श्री. सुनील ललवाणी यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. श्री. भुवाल सिंह यांनी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या संधी असल्याचे सांगितले.
कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
