
वाडिवर्हे येथील हॉटेल संगम मध्ये गँस संपल्याने व नव्याने मिळत नसल्याने अखेर चुल पेटवण्याची वेळ व्यावसायिक विलास चोथे यांचेवर आली आहे.-नवनाथ गायकर,नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
इराण,इस्राएल व अमेरिका युद्धात आखाती देशानां मोठा झटका बसला आहे.आणि तेल व नैसर्गिक गँस उत्पादन व जग भरात पुरवठा करण्यात अग्रेसर असणारे हे देशच युद्धात गुंतल्याने जगात सर्वत्र हा हा कार माजला आहे.
भारतात ही गँस पुरवठाच गँसवर असल्याने टंचाईचा तीव्र फटका नागरिकानां बसत आहे.
या गँस टंचाईचा सगळयात तीव्र फटका छोटया, मोठया खादय व्यावसायिकानां बसला असुन चवीसाठी प्रसिद्द असलेली अनेक उपहारगृह व छोटे छोटे हातगाडावरिल व्यावसायिकाचें उदयोग धंदे बंद पडले आहेत.
अनेकानीं चुलीचा सहारा घेतला आहे.तर काहिनीं तात्पुरते व्यवसायच बंद केले आहे.
दरम्यान गँस पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम दरवाढीवर झाला असुन, खादय वस्तु पाच ते दहा रुपयानीं वाढल्या आहेत.
