शब्दांकन :- अशोक देवकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक (नाशिक)

शिवालिका या तेल वाहू मोठ्या जहाजा नंतर -नंदादेवी -हे एलपीजी गॅस घेऊन येणारे मोठे जहाज अखेर भारतात आले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर माननीय पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने नंदादेवी हे जहाज सकुशल भारतात आले त्यामुळे सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून या जहाजातून आलेल्या एलपीजी मुळे अनेक कुटुंबीयांना मदत मिळणार आहे.

विशेष उल्लेखनीय बाब अशी की, या जहाजावर माझे एक नातेवाईक रानवड येथील सोमवंशी यांचा मुलगाही नेव्ही (व्हाइट शर्ट व गळ्यात पुष्पहार असलेला) मध्ये सर्विस असल्याने तो तेथे उपस्थित होता युद्धजन्य परिस्थितीमुळे व अत्यंत गुंतागुंतीच्या स्थितीमुळे घरातील सर्वांच्या चिंता वाढल्या होत्या मात्र महत प्रयासानंतर भारतातल्या या निवडक जहाजांना मातृ भूमीकडे येण्याची इराणने परवानगी दिले हार्मुज स्ष्ट्रैट या छोट्याशा जागेतून त्यांना येण्याची परवानगी मिळाली ही विशेष बाब आहे .इराणने जगभरातील सर्व देशांना आखातातून प्रवास करण्यास बंदी घातलेली आहे, अशा परिस्थितीत भारताला फक्त ही परवानगी दिली हे विशेष आहे- [ट्रम्प साहेबांनाही खटकले]-अजूनही काही जहाज क्रमाने भारतात प्रविष्ट होतीलच.
सकुशल आलेल्या सोमवंशी व त्याच्या सर्व सवंगड्यांचे हार्दिक अभिनंदन.
आपला शुभेच्छूक
देवकर सर, नासिक.
