
कार्याध्यक्ष सुभाष सबनीस,
नाशिक ( बातमीदार )नाशिक शहराची ओळख कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या मुळे कवितेचे माहेरघर अशी आहे. याच माहेरघरात गेल्या तेवीस वर्षांपासून नाशिक कवी या संस्थेने कवितेचा प्रवाह अखंड वाहाता ठेवला आहे. कवितेचे हक्काचे व्यासपीठ म्हणून नाशिक कवीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहेच. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी कवींना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. यावर्षीपासून जागतिक कविता दिनानिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कवितांचे सादरीकरण होणार आहे. प्रत्येक तासाला वीस कवींचे कविता सादरीकरण होणार असून जवळपास दोनशे कवींनी यासाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक तासाला होणाऱ्या सत्रासाठी एक अध्यक्ष, दोन प्रमुख पाहुणे म्हणजेच परीक्षक आणि एक सूत्रसंचालक असे नियोजन आहे. प्रत्येक सत्रामधून दोन कवींची निवड करण्यात येणार असून समारोपाच्या सत्रामध्ये या प्रत्येक सत्रातील निवड झालेले कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करतील. यामधून एका कवीचे निवड समारोप सत्रातील प्रमुख पाहुणे एका कवीची निवड केली जाईल.या निवड झालेल्या कवीला मानाचा भव्य करंडक देण्यात येईल. सर्व सहभागी कवींना समारोप सत्रामध्ये सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात येईल. यासाठी कोणतेही शुल्क नसून सर्व सहभागी कवींनी आपली उत्कृष्ट कविता सादर करावी असे आवाहन नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी. बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी तसेच स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, भारती देव, प्रांजली आफळे, अजय बिरारी, किरण मेतकर, सुरेश चौरे आणि राजेश जाधव यांनी केले आहे. सर्व नाशिककरांनी या काव्यजगरामध्ये सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
