
चिखली ( प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त सैलानी नगर येथील ईदगाह परिसरात चिखली नगर परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येत असतात त्यामुळे परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाने आगावू तयारी केली यावेळी नगर परिषदेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे सर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या नगरपरिषद अध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्याधिकारी प्रशांत बिडगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली

पाहणी दरम्यान आरोग्य निरीक्षक संजय गिरी व रितिक खरे तसेच सभापती यांचे बंधू नाना जोगदंडे सर, पत्रकार विनोद पवार आणि सैलानी नगरातील सामाजिक कार्यकर्ते सलीम भाई उपस्थित होते. ईदगाह परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर देण्यात आले.शहरातील कोणताही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम असो,चिखली नगरपरिषद प्रशासन नेहमी तप्तरतेने सेवा देत असल्याचे बोलले जात आहे.व समाज बांधवांकडुन समाधान देखिल व्यक्त केले जात आहे.
