
मंचर (प्रतिनिधी)..आज दि 6 एप्रिल भारतीय जनता पार्टी चा 45 वा वर्धापन दिन आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला..भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या “ध्वजाचे पूजन” पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ऑनलाइन व्हिसीद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवणीस साहेब,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.तसेच भाजपा जनसंपर्क कार्यालयात जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करून जिलेबी व लाडू वाटप करण्यात आले.यावेळी संजय भाऊ थोरात म्हणाले,भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा आज 45 वा वर्धापनदिन समर्थ भारताचं स्वप्न पाहिलेल्या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या पुण्याईच्या बळावर आज भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष बनलायसमाजातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरिता राबवण्यासाठी सत्ता असते,या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या मूल्यात्मक विचारांवर आजतागायत भाजपाची वाटचाल सुरू आहे.

अभिमान आहे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा असे म्हणाले व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी संजय भाऊ थोरात, रविंद्र काका त्रिवेदी,विजय भाऊ पवार,माऊली दादा बाणखेले,धनेश बाणखेले,सुनील कहडणे,गणेश थोरात,कालिदास गांजाळे,नवनाथ थोरात,भरत काळे,संतोष थोरात,सुनीत थोरात, महेश लिंगायत,सुभाष थोरात,जितेंद्र त्रिवेदी सर,महिला मोर्चा स्नेहल चासकर,जागृती महाजन,निर्मला भालेराव,ज्योती शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
