
हिमायतनगर प्रतिनिधी शेख खय्युम
हिमायतनगर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्या तर्फे इफ्तार पार्टी आयोजन परंपरा कायम
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिमायतनगर शहरातील चौपाटी येथील जुनी दारूल उलूम मोहम्मदिया आणि सद्याची मदिना मस्जिद येथे मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना निमित्त सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात याचेच औचित्य साधून मागील कित्येक वर्षापासून हिमायतनगर शहराचे प्रतिष्ठित नागरिक आणि सध्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब इफ्तार पार्टीचे आयोजन करतात

याप्रसंगी हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेतृत्व कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर हिमायतनगर तालुक्याचे सर्व राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
या कार्यक्रमात सुत्र संचलनाची कारला येथील तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.गफार भाई कार्लेकर यांनी प्रमुख भूमिका बजावली.
याप्रसंगी भोकर चे डी.वाय.एस.पी. हाके साहेब आणि हिमायतनगर शहराचे पोलीस निरीक्षक अमोल भगत साहेबही उपस्थित होते
