
दरवर्षी कवी संदीप जगताप यांच्या संकल्पनेतून व कवी प्रा.लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला जातो. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती 15 एप्रिल 2026 पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवाव्यात.
पुरस्काराची निवड ही निवड समितीमार्फत केली जाते. व दरवर्षी फक्त एकाच कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सदर पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन लक्षदीप फाउंडेशनच्या कवयित्री शितल कुयटे व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
मा.संयोजक,
लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार
‘तीर्थरूप’, प्रगती कॉलनी, चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत. ता. निफाड, जि. नाशिक.
पिनकोड – 422 2 09
संपर्क – 9422757523,
7218625960,7798333494
