
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१३ वा दिवस
जर तुम्ही वेद वाचले तर तुम्हाला जाणवेल की 'नाभयेत्' 'अभी' अर्थात कुणालाच घाबरायचे नाही. हे वारंवार सांगितले आहे. घाबरणे हे दुर्बलतेचे चिन्ह आहे आणि हीच दुर्बलता माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गापासून बाजूला करून पापमार्गाकडे घेऊन जाते. त्यामुळेच जगातील उपहास किंवा व्यंग याकडे अजिबात लक्ष न देता माणसाने निर्भय होऊन आपले कर्तव्य सातत्याने करीत राहिले पाहिजे. तुमच्यात अचाट शक्ती आहे, त्याने तुम्ही अद्भुत कार्य कराल. ज्याक्षणी तुम्ही घाबराल त्याक्षणी तुम्ही शक्तीहीन व्हाल. जगातील दुःखाचे कारणच भय आहे. निर्भय बना, विचारांचा सामना विचारांनीच करा. अशुभाच्या भीतीने जगात इकडे तिकडे पळू नका. अशुभ हे अशुभच असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २७ शके १९४७
★ फाल्गुन अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १८ मार्च २०२६ ★ १५९४ हिंदवी स्वराज्याचे प्रणेते शहाजीराजे भोसले यांचा जन्मदिन
★ १६८९ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन (तिथीनुसार)
★ १८५८ डिझेल इंजिनचा शोध लावणारे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्मदिन
★ १८८१ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्मदिन.
