
सिन्नर (प्रतिनिधी)
ग्राहकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आपले हक्क व कर्तव्य जाणून घ्यावी.खरेदी करताना सतर्क राहण्याचे आव्हान नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी केले. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तहसील कार्यालयाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक विद्यमाने ” जागतिक ग्राहकदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महामित्र दत्ता वायचळे,ग्राहक पंचायतचे पदाधिकारी डॉ.श्यामसुंदर झळके,बापू चतुर,पुरवठा नायब तहसीलदार विवेक जमधडे,पुरवठा निरीक्षक राजेंद्र पोळ, विधीज्ञ भाग्यश्री ओझा,महसूलचे सतिश दळवी उपस्थित होते.यावेळी दत्ता वायचळे, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी डॉ.श्यामसुंदर झळके,यांनी ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेऊन सायबर सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले. ॲड.भाग्यश्री ओझा यांनी महिलांनी कोणतीही वस्तू अथवा माल खरेदी करताना पक्के बिल घ्यावे ,तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. बापू चतुर यांनी ग्राहक दिनाचे महत्व विषद करून,ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याचे आवाहन केले. पुरवठा लिपिक सोनाली आहेर यांनी सूत्रसंचालन केले.शशिकांत सावंत,अमर कुमावत,निवृत्ती बर्वे यांनी आयोजन केले,विवेक जमधडे यांनी आभार मानले.
