नांदगाव ( प्रतिनिधी. ) श्री क्षेत्र शनि महाराज मंदिर संस्थान, नस्तनपुर या.नांदगाव येथे शतक महोत्सवी निमित्त आयोजित शंभर वर्षांची परंपरा असलेल्या भव्य दिव्य एक्का पारायण सोहळा बुधवार दि. १८ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. हा सोहळा साक्षात प्रभू रामचंद्र प्रस्थापित श्री शनि महाराज मंदिराच्या कांगणात साजरा होणार आहे सन १९२६ -१९२७ या सणाला पासून अविरत हा सोहळा होत असतो या वर्षी हा सोहळा १०० वर्ष पूर्ण करत आहे. अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात हा मानाचा तुरा मानला आहे.
वै. वेडुजी पांडुजी पाटील. ( न्यायडोंगरी) वै. रामचंद्र माधवराव पवार,वै. बाळा फकिरा गायकवाड ( परधाडी) वै. त्र्यंबक संपत सुर्वे ( चांदोरा) वै.राऊत बाबा ( जळगाव बु.) वै.लालमण लक्ष्मण गरुड ( पिंपरखेड) वै. शामराव दादाजी वेळसकर ,वै.त्र्य़बकराव वाघ ( पिंपरी हवेली) आदी पंचक्रोशीतील तत्कालीन पूर्वजांनी हा सोहळ्याची यशस्वीपणे पऱपरा सुरु ठेवली.
१५ फेब्रुवारी १९५४ रोजी श्री शनि महाराज मंदिर संस्थांची स्थापना केली. त्यावेळी विश्वस्त वै.कमळदासजी महाराज,वै. शिवराम वेडुजी पाटील,वै. राधाकृष्ण जमनादास बारी,वै. बन्सीलाल गुलाबचंद नहार,वै.राघो लक्ष्मण पाटील ( न्यायडोंगरी ) वै. भाऊराव लालमण गरुड ,वै.सुकदेव तुकाराम गरुड ( पिंपरखेड) वै.माधव भंडारी ( चाळीसगाव) वै.त्र्य़बक संपत सुर्वे ( चांदोरा ) वै.तुळशीरामशेठ कलंत्री ( नांदगाव ) आदींनी संस्था विकासाबरोबरच एक्का पारायणाची परंपरा जनमानसात रुजवली व परंपरा उज्वल केली.
श्री क्षेत्र नस्तनपूर विकासाकडे वाटचाल होत असतांनाच वै.पोपटराव दशरथ पवार,वै.विश्वास बाजीराव पवार ( परधाडी) वै. ॳॅड.गोविंद केशव जोशी ( नांदगाव ) वै.अनिल दादा देशमुख ( चाळीसगाव ) यांचे योगदान पारायण सोहळ्यास मोलाचे ठरले. अत्यंत अडचणीच्या काळात हा शतक महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहिला त्यात वै. गंगाधर शिवराम आहेर वै. विजय शिवराम आहेर या बंधुंची मोलाची साथ संस्थानला लाभलेली आहे.

आठ खोल्यांची दगडी धर्मशाळा सन.१९६२ च्या दरम्यान मंदिर परिसरात उभी राहिली. यासाठी वै. कमलदासजी महाराज ( न्यायडोंगरी) वै.तुळशीरामशेठ कलंत्री ( नांदगाव) यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. या धर्मशाळेत अनेक वर्ष रोडग्याचे व नवस फेडण्याचे धार्मिक कार्य पार पाडले. सन १९९० पण मध्ये संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॳॅड.गोविंद केशव जोशी यांनी न्यायडोंगरीचे भूमीपुत्र ॳॅड.अनिल दादा आहेर यांच्यावर विश्वस्त पदाची जबाबदारी सोपवली व यापासून नस्तनपूर श्री शनि महाराज मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासाला चालना मिळाली.
सन.१९९८-९९ या वर्षी संस्थानचे विश्वस्त ॳॅड.अनिल दादा आहेर हे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या काळात त्यांनी नस्तनपूर तिर्थाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेत झाला. आणि मंदिर विकासाला गती प्राप्त झाली. आज ॳॅड.अनिल दादा संस्थानचे अध्यक्ष आहेत. सन. २०१४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे पर्यटन व सा.बा.विभागाचे मंत्री मा. छगनजी भुजबळ यांनी नस्तनपूरच्या विकासासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे मंदिर परिसरात बाग,बगीचे, विविध इमारती व अद्यावत मंदिरामुळे शनि भक्तांचे स्वप्न साकार झाले. व परिसर निसर्गसौंदर्याने बहरला. त्यामुळे भाविकांची दिवसेंदिवस गर्दी येथे वाढत आहे. या भक्तांना अधिकाधिक सुख- सुविधा संस्थानकडुन देण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. नांदगावचे विद्यमान आमदार मा. सुहास आण्णा कांदे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे श्री क्षेत्र नस्तनपूर क्षेत्राला महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र पर्यटन आराखड्याला “ब” वर्गाचा विशेष दर्जा मिळाला आहे.त्यामुळे संस्थानचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. .
संस्थानचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष ॳॅड.अनिलदादा आहेर, उपाध्यक्ष उदय वसंतराव पवार,जन.सेक्रेटरी खासेराव साहेबराव सुर्वे, खजिनदार विजय अमोलकचंद चोपडा व विश्वस्त सर्वश्री डॉ.शरदचंद्र गंगाधर आहेर,नारायण मांगिलाल अग्रवाल, शिवराम किसन कांदळकर, कैलास बाजीराव गायकवाड,भागवत संपत वाबळे,वाल्मिक दगडु सुरासे व उदय ओंकार पाटील हे अकरा विश्वस्त विद्यमान स्थितीत कामकाज पहात आहेत. मंदिर परिसरात पस्तीस एकर जमीनीची खरेदी विश्वस्त मंडळाने केलेली आहे. या कोट्यावधी रुपयांच्या जमीनीमुळे मंदिराच्या विकास योजनांना गती मिळाली आहे. शिर्डी, शेगावच्या धर्तीवर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा मानस विश्वस्त मंडळाचा आहे.
एक्का पारायणाचे १०० वर्षाची उज्वल परंपरा पुर्ण करीत असतांनाच या सोहळ्याचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ह.भ.प.डाॅ.रामकृष्णदास महाराज लहवितकर. हे खत ५४ वर्षापासून या सोहळ्यात किर्तन सेवा देत आहे. ही सेवा उल्लेखनीय आहे.

शतक महोत्सवी धर्म सोहळ्यातील कार्यक्रम रुपरेषा पुढील प्रमाणे
फाल्गुन कृ.आमवश्या व गुढीपाडवा च्या पुर्व संध्येला बुधवार दि. १८/०३/२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता विणापूजन श्री. ॳॅड.अनिलकुमार गंगाधर आहेर ( अध्यक्ष श्री क्षेत्र शनीमहाराज मंदिर संस्थान नस्तनपूर) यांच्या शुभहस्ते , मृदुंगाचार्य:- ह.भ.प.नंदू महाराज दौंड,
हरिपाठ सायं.५ ते ६ वा.नस्तनपूर शनि महाराज वारकरी शिक्षण संस्था नस्तनपूर ता.नांदगाव.
विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नांदगाव ता.नांदगाव, राधाराणी महिला वारकरी शिक्षण संस्था सावरगाव ता.नांदगाव
ह.भ.प.आकाश महाराज उगले हरी कीर्तनानंतर भजनाचा (जागर ) कार्यक्रम आयोजित केला आहे.
सायं.भोजन :- सायं.७.०० ते ८.०० श्रीमती विजया विजय आहेर व परिवार,न्यायडोंगरी ता. नांदगाव
किर्तनकार :- रात्री ०९ .०० ते ११.०० वा. जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर श्री.महंत डॉ.रामकष्ण दास महाराज लहवितकर यांचे जाहिर किर्तन.
गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी नुतन वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वै. विजय ( मामासाहेब) शिवराम आहेर न्याय डोंगरी यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती.विजया विजय आहेर यांचे तर्फे महाप्रसाद कार्यक्रम होईल.
या थोर परंपरा असलेल्या या शतक महोत्सवी सोहळ्यास उपस्थित रहावे. असे आवाहन श्री क्षेत्र शनीमहाराज संस्थानाने केले आहे.
कार्यक्रम स्थळ:- शनि महाराज मंदिर प्रांगण नस्तनपूर ता.नांदगाव.जि.नाशिक.
पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती…
