नाशिक (प्रतिनिधी)दिनांक १५/३/२०२६ रोजी साहित्य रंग साहित्य मंच आयोजित जल्लोष साहित्याचा २६ हा सुशीलकुमार शिंदे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम राणी भवन नाशिक येथे मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला. सदर कार्यक्रमात बदलापूर येथील गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या "गझल प्रज्ञा" ह्या त्यांच्या दुसऱ्या गझल संग्रहास उत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ पूजन म्हणून ह्या गझल संग्रहाची मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
त्याच कार्यक्रमात प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.सदर स्पर्धेत यशवंत पगारे यांना प्रथम पारितोषिक मिळाले
त्यांच्या ह्या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
त्यांच्या ह्या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे