
नांदगाव ( प्रतिनिधी).दिनांक 7 एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नागरिक श्री.बाळासाहेब बागूल यांची उपस्थिती अमूल्य ठरली. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,शिक्षक ,शिक्षिका सर्व विद्यार्थी व स्कूलचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून औक्षण केले नंतर सेल्फी कॉर्नरवर फोटो काढले.मा.मॅनेजमेंटच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानेकरण्यात आली. सोबतच पालक व विद्यार्थ्यांनी पूजन केले. गायत्री मंत्राच्या मंत्रमुग्ध वातावरणात विद्यार्थ्याकडून मोरपिसानेमुळाक्षर लिहून घेतली.

.सर्व स्थानापन्न झाल्यावर संस्थेचे उपाध्यक्षांनी संस्थेचे अध्यक्ष यांचा सत्कार केला.मीस फर्नाडिसने संस्थेचे उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.यंदा 2024 ते 25 वर्षी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी खूप स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लेखन स्पर्धा, वाचन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा ह्या स्पर्धात उत्तम सहभाग लाभला.बक्षीसपात्र प्रत्येक विद्यार्थ्यांस सन्मानित करण्यात आले.मिसेस पाटील ह्या पालकांनी मुलीमधली प्रोग्रेस व स्कूलचे कौतुक केले.मा.मॅनेजमेन्टने नवीन शैक्षणिक धोरण विचार सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिसस्वप्नाली शिंदे व मिस गायत्री चव्हाण यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेतली.
