
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी – शेख खयुम):
शहराचे लाडके आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाने हिमायतनगरकरांची मने जिंकली आहेत! आगामी पवित्र ईद-उल-फितरच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी कोणतीही अडचण येऊ नये, या उदात्त हेतूने नगराध्यक्षांनी स्वतः मैदानात उतरून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
जेसीबीच्या सहाय्याने कायापालट:
स्वतःच्या देखरेखीखाली जेसीबीच्या सहाय्याने ईदगाह मैदानाचे समतलीकरण (लेव्हलिंग) अत्यंत देखण्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. “नमाज पठण करताना माझ्या एकाही मुस्लिम बांधवाला त्रास होता कामा नये,” ही भावना उरात बाळगून नगराध्यक्षांनी भर उन्हात उभे राहून ही जबाबदारी पूर्ण केली.
हिंदू-मुस्लिम एकतेचा महामंत्र:
यावेळी नगराध्यक्ष शेख रफीक यांनी शहरात हिंदू-मुस्लिम एकता आणि भाईचाऱ्याचा मोलाचा संदेश दिला. “शहराचा विकास आणि सर्व धर्मीयांचा सन्मान हीच माझी प्राथमिकता आहे,” असे सांगत त्यांनी सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श घालून दिला. केवळ खुर्चीवर न बसता, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी दाखवलेली ही तत्परता ‘खऱ्या लोकनेत्याची’ ओळख करून देत आहे.
