
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१२ वा दिवस
प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने त्याच्या जीवनात आदर्श घेऊन त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तुमच्यासमोर विविध आदर्श ठेवणे इतकेच माझे कर्तव्य आहे. जे आदर्श कधीच पूर्ण करू शकणार नाहीत असे दुसऱ्याचे आदर्श घेऊन चालण्यापेक्षा आपल्याच आदर्शांचे अनुसरण करणे हाच यशस्वी होण्याचा अधिक चांगला मार्ग आहे. तुमच्या स्वभावानुसार जो तुम्हाला अधिक अनुकूल वाटेल तोच आदर्श तुम्ही स्वीकारा आणि त्याच दिशेने अविरत प्रयत्न करा तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आदर्श पुरुष तर ते आहेत जे परमशांती व निःसब्धतेमध्येही तीव्र कामाचा तसेच प्रबळ कर्मशीलतेमध्येही वाळवंटातील शांती व निःस्तब्धतेचा अनुभव घेतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २६ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १७ मार्च २०२६
★ १८८२ आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृतीदिन
★ १९१० समाजसेविका अनुताई वाघ यांचा स्मृतीदिन.
