
नांदगाव 🙁 प्रतिनिधी) नाशिक जिल्हा मराठी संघ, नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा अत्यंत मानाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार’ नांदगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेचे उपशिक्षक श्री. संजय काळूराम जाधव यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
संजय जाधव यांनी आदर्श प्राथमिक शाळेत अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. मराठी भाषेचे संवर्धन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच निष्ठेचा आणि योगदानाचा सन्मान नाशिक जिल्हा मराठी संघाने केला आहे.

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. नाशिक येथे आयोजित एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
संजय जाधव यांच्या या यशाबद्दल मविप्र तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे -पाटील,आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री साळुंके अविनाश, व्यवस्थापन समितीचे श्री गवांदे काका, शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा व अभिनंदन केले आहे.
