
जल्लोष साहित्य चा कार्यक्रम मध्ये गायन स्पर्धा प्रथम स्वीकारताना सौं गायत्री गवारे डावीकडून सुशील कुमार शिंदे आयोजक, सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक, वैशाली ताई सोनवणे जेष्ठ कवियत्री बाळासाहेब गायकवाड संभाजी नगर, सुनील शिरसाठ कवी व डॉक्टर प्रदीप कुमार कळस्कर कवी जळगाव दिसत आहे
नासिक ( प्रतिनिधी). साहित्य रंग साहित्य मंच आयोजित स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ जल्लोष साहित्याचा महोत्सव 26 अंतर्गत काव्य व गायन स्पर्धा संपन्न झाली. यात अजून विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम चे प्रमुख अतिथी सुहास टिपरे, जेष्ठ साहित्यिक यांनी कवी यांना मार्गदर्शन करताना सांगितलं कि आपल्या मनातील भावना यांना आपल्या आपल्या शब्दाच्या माध्यमातून व्यक्त झाले कि सर्वोत्तम कवितेची निर्मिती होते ज्या पद्धतीने कवी केशवसूत कवी कुसुमाग्रज कवी च्या माद्यमातून राष्ट्र प्रेम, माणुसकी विज्ञान संवेदनशीलता सहानुभूती इतिहास असे अनेक विषय हाताळले गेले आहेत. कविता लेखन हे आव्हानत्मक असते. तो सृजनाचा अखंडित प्रवास असतो असे विचार सुहास टिपरे यांनी मांडले. प्रमुख अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड संभाजी नगर, डॉ प्रदीप कुमार कळसकर जळगाव, नागोरावजी सोनकुसरे जेष्ठ कवी नागपूर, वैशाली ताई सोनवणे जेष्ठ कवियत्री सटाणा, सुनील शिरसाठ कवी ठाणे, विमल पाटकरी जेष्ठ कवियत्री, पूजा बाई पाटील सामाजिक कार्यकर्त्यां लीलावती कापडणीस गृह पाल आदिवासी विभाग व सुशील शिंदे आयोजक यांनी प्रेक्षक रसिक कवी यांना मोलाचे मार्गदर्शन केलें सुशील कुमार शिंदे व्याख्याते कायदे अभ्यासक समीक्षक यांचे शिवाजी महाराज यांच्या वरचे विचार प्रभावी पणे मांडले संपुर्ण कार्यक्रम चे उत्कृष्ट सूत्रसंचालन कवियत्री सौं गायत्री गवारे यांनी अत्यंत प्रभावी केलें व रसिक यांची वाहवा मिळवली. संपुर्ण कार्यक्रम तील काव्य वाचन स्पर्धा पारदर्शक पणे पार पडली.

अनेक महाराष्ट्र तुन आलेल्या कवी मधून स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ प्रथम क्रमांक प्रीती सोनवणे, दुसरा क्रमांक श्रावणी खातळे, तिसरा क्रमांक सह्याद्री नाठे व उ्तेजनार्थ गायत्री गवारे यांनी सन्मानाने प्रदान झाला. गायन स्पर्धा स्वर्गीय विमल हरिश्चंद्र टिपरे स्मरणार्थ प्रथम क्रमांक गायत्री गवारे, दुसरे सम्रादणी सूर्यवंशी, तृतीय श्रावणी खातळे व उ्तेजनार्थ सुनीता झावरे अहिल्यानगर यांनl सन्मानाने प्रदान झाला. प्रश्नामंजुषा स्पर्धा मध्ये प्रथम यशवंत पगारे व दुसरा श्रावणी खातळे व तृतीय सुनंदा भोये यांना प्राप्त झाला आहे. कार्यक्रम चे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब घोडेराव यांच्या सौजन्य ने आयोजित काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री गवारे, दुसरा प्रीती सोनवणे व गायत्री मोराडे व तृतीय क्रमांक कुशल दुसाने यांना सन्मानाने प्रदान झाले. यशवंत त्रिंबक पगारे गझल सम्राट व सह्याद्री नाठे यांचा विषय सन्मान केला आहे. दिवसाची विशेष व्यक्ती म्हणून रामचंद्र निजामपूरकर जेष्ठ कवी यांना सन्मानीत केलें राणी भवन येथे 15 मार्च रोजी पार पडलेल्या यशस्वी संमेलन चे आयोजक सुशील कुमार शिंदे व उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या सौं गायत्री गवारे यांचे सर्वांनी अभिनंदन केलें आहे!!
