
सायखेडा:( प्रतिनिधी ) आज सोमवार दिनांक १६/३/२०२६ रोजी जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयाचा ६५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मविप्र समाजाचे निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख साहेब, तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री विजय कारे, सदस्य श्री दिलिप शिंदे, सदस्य श्री सुनिल कुटे प्राचार्य श्री रामदास वाजे उपप्राचार्य श्रीम अलका अहिरे पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार अभिनव बालविकास मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम विभागप्रमुख श्री कांडेकर सर श्री संधान सर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यास आली, मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री रामदास वाजे यांनी केले. प्रास्ताविकात प्राचार्य श्री वाजे सर यांनी विद्यालयाचा ६५ वर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. व शाळेच्या इतिहासात ज्या ज्या धुरीनांनी मदत केली त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सर्व मान्यवरांचा मा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. श्रीमती मनिषा शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला,त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या निबंध स्पर्धेत लहान गटात कु.अवनी कुटे व कु. दिव्या कायस्थ तसेच मोठया गटात कु.संपदा कांडेकर व कु.अनुष्का खालकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक मिळविलेल्या निबंधाचे वाचन कु अवनी कुटे व कु संपदा कांडेकर यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून व केक कापून शाळेचा वर्धापन दिन(वाढदिवस )साजरा करण्यात आला. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सदस्य श्री दिलिप शिंदे यांनी शाळेच्या वाटचाली विषयी सविस्तर माहिती दिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मविप्र समाजाचे निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख यांनी शाळेच्या इतिहासात व प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांप्रती विशेषता मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली. व सगळ्यांचे शाळा विकासात योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. श्री.अवधूत आवारे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन श्री.अशोक टर्ले यांनी केले. सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.ज्ञानेश्वर कर्पे यांनी कार्यक्रमाचे सुंदररित्या आयोजन केले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने गोड भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे फलकलेखन विलास महाले व श्रीम कापडी मॅडम यांनी केले.
