
नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स व नॉन टीचिंग क्रेडिट सोसायटी याचेंकडून दरवर्षी आदर्श शिक्षक व उत्कृष्ट सेवक पुरस्कार दिला जातो सन २०२५-२५ यावर्षीचा उत्कृष्ट सेवक पुरस्कार यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक श्री.शिवाजी तुकाराम चव्हाण यांना रावसाहेब थोरात सभागृह ,नाशिक येथे

रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.भास्करराव भगरे सर व मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाशजी वैशंपायन ,उपाध्यक्ष मा. प्रभाकर कुलकर्णी , स्कूल कमिटी चेअरमन मा.रमेश महाशब्दे , सेक्रेटरी श्री.हेमंत बरकले, अधीक्षिका सौ.मीना वाळुंजे मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे उपमुख्याध्यापक श्री. परशराम पुंड ,श्री. मिलिंद कोठावदे , पर्यवेक्षक श्री.राजेंद्र सोमवंशी , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल, सौ.भारती चंद्रात्रे,जाईंट सेक्रेटरी सौ.संगिता चव्हाण व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
