
कारभारी चतुर व विठाबाई चतुर यांचा मातृ-पितृ अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
मिठसागरे :(प्रतिनिधी )येथील प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त मैल कामगार श्री. कारभारी एकनाथ चतुर यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने तसेच आयुष्यभर साथ देणाऱ्या सौ. विठाबाई कारभारी चतुर यांच्या मातृ-पितृ अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदिर पटांगण, मिठसागरे येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी ह.भ.प. स्वरमूर्ती नंदकिशोर महाराज देवकर (कुंभारी) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. आपल्या कीर्तनातून त्यांनी आई-वडिलांचा सन्मान करणारे असे सामाजिक संस्कार सोहळे समाजात होत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमास मिठसागरे व परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत चतुर परिवाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पुंडलिक भीमाजी कथले माध्यमिक विद्यालय यांना दोन डायस सप्रेम भेट म्हणून प्रदान केले.
यावेळी कुटुंबाच्या सुरुवातीच्या काळात आधार देणाऱ्या नातेवाईकांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री. कारभारी चतुर व सौ. विठाबाई चतुर यांचे कौटुंबिक औक्षण करून पूजन करण्यात आले.
ज्ञानदेव वर्पे, विकास वर्पे, प्रभाकर चतुर, जगन्नाथ शिंदे, वैशाली चतुर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा देत उभयतांना निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रभाकर चतुर यांनी कुटुंबाच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत भावनिक कविता सादर केली.
यावेळी चतुर कुटुंबीय भावनिक होत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शेवटी बापू चतुर यांनी उपस्थित सर्व मान्यवर व अतिथींचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कासार यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी मिष्टान्न भोजन केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
