
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख मुजम्मील):
काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण यांच्या मार्गदर्शनातून नगरसेवक मो़.मुजतबा मतीन यांची तत्परता शहरातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये सय्यद अहमद यांच्या घरासमोरील मुख्य पाणीपुरवठा मोटर अचानक निकामी झाल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक मो़ मुजतबा मतीन यांनी तातडीने नवीन मोटर उपलब्ध करून दिली.
सदर मोटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्याने आता परिसरातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. ऐन वेळी उद्भवलेल्या या संकटावर नगरसेवकांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे वॉर्डातील रहिवाशांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
