
नांदगाव ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका आयोजित
भारतीय संसदेचा अवमान करणाऱ्या राहूल गांधी, काँग्रेस व सहयोगी खासदार विरोधात 15 मार्च 2026 रोजी ज्येष्ठ नेत्या ॲड.जयश्रीताई दौंड राज्य परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन…
१२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वारच्या बाहेर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षातील जवळपास २० खासदारांनी चहा-बिस्कीट बरोबर ‘चायपार्टी’ आयोजित करणे ही अत्यंत बेजवाबदार, खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एकप्रकारे ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’ बनविण्याचे विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे मकर प्रवेश द्वाराजवळ कुठलेही धरणे-प्रदर्शन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असतांनाही विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रवेशद्वारासमोर बसून विरोध करण्याचे नाटक केले, जे संसदीय नियमांची आणि अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारे आहे.
यावेळी देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरविण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले* आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा पुरविण्याकरिता वचनबध्द होऊन सातत्याने काम करीत आहे.
धरणे प्रदर्शन सहभागी झालेल्या काँग्रेस व सहयोगी खासदारांविरोधात आज रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी हुतात्मा चौक नांदगाव जोरदार निदर्शने करण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित सौ. मनीषाताई भारत काकड मंडळ अध्यक्ष भालूर यांचे सह
गणेश शिंदे मा.तालुका अध्यक्ष, सतीश शिंदे महामंत्री, ताराबाई शर्मा, ता.उपाध्यक्ष , दादासाहेब बोरसे , राहुल अहिरे,ॲड उमेश सरोदे, दिनेश जेजुरकर,
विजय भुसनर, रवीकाका कवडे, सुनील चंदन ,नारायण नागरे, शानूभाऊ भालेराव ,
मनेश नाईकवाडे,
ॲड अर्चना आढाव ,
प्रियंका काळे ,नितीन चव्हाण उषा चव्हाण, भगवान सोनवणे ,सुरेश कुमावत
अण्णा उगले उत्तम नागरे विष्णू नागरे विनायक कलवर, कल्याण सदगीर पुंजाराम बेंडके, प्रशांत इनामदार प्रकाश थोरात, डॉ. बाळासाहेब आहेर, भारत काकड सर, वाघ मावशी अपूर्वा ताई जोशी किरण भाऊ गवळे ,बापूभाऊ नगरकर, बळवंत चौधरी, वैभव पवार ,सुभाष मोरे ,रामकृष्ण हेंबडे, बिरुदेव वडघर ,गोपी कासार गणेशभाऊ शर्मा,
अशोक आयनोर, माधव काजळे ,मनोज काकळीज, अमरीन ताई ,नारायण चव्हाण, सुदाम पवार, श्रावण हेंबाडे,सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
