
नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास को-ऑप. बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रु. 4 कोटी 14 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास लिलावती जयदेव ठाकूर यांनी दिली.विश्वास बँकेच्या 31 मार्च 2025 अखेर एकूण ठेवी रु. 572 कोटी 75 लाख झाल्या असून कर्ज वाटप रु. 372 कोटी 03 लाख व सीडी रेशो 64.96% इतका आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. 944 कोटी 78 लाखांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ढोबळ नफा रु. 7 कोटी 56 लाख व निव्वळ नफा रु. 4 कोटी 14 लाख झालेला आहे. बँकेचे भागभांडवल रु.18 कोटी 49 लाख असून सभासद संख्या 9 हजार 983 इतकी आहे, बँकेचा निधी रु.38 कोटी 75 लाख, गुंतवणूक रु. 193 कोटी 21 लाख, थकबाकी वसुली 98.16%, ग्रॉस एनपीए 3.84%, नेट एनपीए 2.09% सीआरएआर 15.30% तर खेळते भांडवल रु. 635 कोटी 01 लाख इतके आहे.विश्वास ठाकूर यांनी बँकेच्या 28 वर्षांच्या वाटचालीचा व प्रगतीशीलतेचा आढावा घेतांना नमुद केले की, बँकेच्या सध्या 13 शाखा व 1 केंद्र कार्यालय कार्यरत असून बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 2 शाखा उघडण्यास परवानगी मिळाली आहे. या दोन्ही शाखा ग्राहकांच्या सेवेत लवकरच रूजू होत आहेत व एक शाखा 31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीप्रमाणे FSWM (Financially Sound and Well Managed) या अंतर्गत उघडण्यात येईल. म्हणजेच या आर्थिक वर्षात बँकेच्या 3 नवीन शाखा उघडणार आहेत.विश्वास बँक आधुनिक कार्यप्रणाली व बँकिंगमधील नवनवी आव्हाने यांचा स्वीकार करून आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट ग्राहकसेवा देत आहे. बँकेने स्थापनेपासून ऑडिटचा ‘अ’ वर्ग प्राप्त केलेला आहे. विश्वास बॅँकेत कोअर बँकिंग प्रणाली अस्तित्त्वात असून सर्व शाखा कोअर बँकिंगच्या माध्यमातून एकमेकांना जोडलेल्या असल्याने कोणत्याही शाखेतून ग्राहकांना आपल्या खात्यावरील बँकिंगचे व्यवहार पूर्ण करता येतात. तसेच विश्वास बँकेत एटीएम/डेबीट कार्ड, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, सीटीएस चेक बुक, एसएमएस, पॅनकार्ड, फ्रँकिंग, वीज बिल भरणा केंद्र, सर्व प्रकारचे टॅक्स भरणा, खात्याला आधार लिंक करण्याची सुविधा, आरटीजीएस/एनईएफटी, लॉकर्स, मोबाईल बँकिंग, डेली कलेक्शन, किशोर विश्व योजना, ऑनलाईन टॅक्स भरणा, बीबीपीएस सुविधा तसेच गृहकर्ज, सोनेतारण कर्ज, हप्तेबंदी कर्ज, नवीन वाहन खरेदी कर्ज, जुने वाहन खरेदी कर्ज, गाळा खरेदी कर्ज, एलआयसी पॉलिसी कर्ज, शैक्षणिक कर्ज व कॅशक्रेडिट कर्ज इत्यादी सेवा-सुविधा बँकेतर्फे दिल्या जातात. बँकेच्या सर्व खातेदारांना विश्वास बँकेच्या खात्यावर युपीआय ट्रान्झेक्शन करता याव्यात यासाठी क्युआर कोडची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देऊन कॉर्पोरेट बँकिंगच्या युगात आधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी विश्वास बँक कायमच कटीबद्ध आहे.सभासद व ग्राहकांच्या सहकार्याने सहकाराची मूलतत्वे पाळून विश्वास को-ऑप. बँकेची वाटचाल यशोशिखराकडे होत आहे. सहकार आणि सामाजिक जाणीव ह्या दोन गोष्टी बँक जाणीवपूर्वक जोपासत आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळेच बँक सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. तत्पर आणि विनम्र ग्राहकसेवेचे व्रत विश्वास को-ऑप. बँकेने कायम जोपासले आहे. त्यामुळे ग्राहकांना जोडणे हा एकप्रकारे बँकेचा सामाजिक बांधिलकीचाच भाग आहे. कॉर्पोरेट व्हिजन आणि मिशनचा नागरी सहकारी बँकांनी स्वीकार करणे ही काळाची गरज आहे आणि ते विश्वास बँकेने स्वीकारले आहे, म्हणूनच गुणवत्तापूर्ण बँकिंगचा आदर्श विश्वास बँकेने टिकवून ठेवला आहे. अत्याधुनिक सेवा व पारदर्शक व्यवस्थापन बँकेच्या आधुनिक वाटचालीचे वैशिष्ट्य आहे.संस्थेचा उत्कर्ष हा एकप्रकारे समाजाचा उत्कर्ष असतो. त्यामुळेच सर्व थरातील जनतेपर्यंत परिणामकारक बँकिंग पोहोचवण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सर्वोत्तम सकारात्मक प्रयत्नांतून बँकेची यशोशिखराकडे वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी व सेवाभावी वृत्तीने विश्वास बँक काम करत आहे.बँकेच्या प्रगतीशील वाटचालीत बँकेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत संकलेचा, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, जनसंपर्क संचालक घनःशाम येवला, संचालक विलास हावरे, डॉ. वासुदेव भेंडे, अजित मोडक, सौ. वैशाली होळकर, डॉ. सुभाष पवार, शशिकांत पारख, विक्रम उगले, सौ. मंगला कमोद, कैलास पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. प्रशांतकुमार पाटील, विजय लगड, अॅड. दत्तप्रसाद निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सारिका देशपांडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बागुल व अधिकारी/कर्मचारी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे, असेही विश्वास ठाकूर म्हणाले.
