
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी : पाटोळे (ता.सिन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून पोडियम साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली.या साहित्याचा वितरण सोहळा नुकताच झाला.सामाजिक कार्यकर्ते विलास रामनाथ खताळे यांनी याकामी पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ खताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वितरण कार्यक्रमात माजी सरपंच मेघराज आव्हाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे, माजी अध्यक्ष निवृत्ती कराड, रामहरी खताळे,सोपान खताळे , विनायक सांगळे, संदीप खताळे, अनिल खताळे, राजेंद्र खताळे, नवनाथ आंधळे, सखाराम सांगळे, बाळासाहेब सांगळे आदी उपस्थित होते.

शाळेचे उपशिक्षक कैलास पवार यांच्याकडे पोडियम साऊंड सिस्टीम सुपूर्द करण्यात आली. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी आमदार तांबे यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.या साऊंड सिस्टीममुळे शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रार्थना, मार्गदर्शनपर उपक्रम अधिक प्रभावीपणे घेता येणार असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व शालेय समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी आमदार सत्यजित तांबे तसेच या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करणारे विलास रामनाथ खताळे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
