
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी: सोनांबे (ता. सिन्नर) येथे शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा एक अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ रामकुमार, उपजिल्हाधिकारी सीमा आहिरे (रो.ह.यो.), तहसीलदार सुरेंद्र देशमुख , नायब तहसीलदार माणिक गाडे, निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा, मंडल अधिकारी संदीप शिरोळे, पुरवठा निरीक्षक जमदाडे, महसूल अधिकारी गोवर्धने, अकबर तांबोळी, देवनदी पतसंस्थेचे अध्यक्ष केरू पवार, ग्रामपंचायत प्रशासक सौ. प्रमिला पवार, उद्योजक टी.आर. पवार, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन संचालक अनिल पवार, तंटामुक्ती अध्यक्ष दामु बोडके, गोवर्धन पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार, पोलीस पाटील चंद्रभान पवार, सोपान बोडके, नंदु पाटील पवार, सुधाकर नवले, शिवाजी पवार, सोनांबे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी परिसरातील लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल व विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. शासन निर्णयानुसार भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित ७/१२ ची १ नोंद, जीवंत सातबारा मोहिमेअंतर्गत ४ सातबारा नोंदी,करण्यात आल्या. तसेच १५५ दुरुस्तीचे ५ अर्ज, ३१ वारस नोंदी, १३ फेरफार दुरुस्त्या व २९ प्रलंबित फेरफार निर्गत करण्यात आले.
कृषी व डिजिटल सेवांमध्ये ॲग्री स्टॅग अंतर्गत ४२ मान्यतापत्रे देण्यात आली तसेच ३ नवीन नोंदणी करण्यात आल्या. पीएम किसान योजनेसाठी ६ नवीन नोंदणी करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी ४८ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले तर ८५ अर्ज प्राप्त झाले. पुरवठा विभागामार्फत १५ रेशनकार्डमध्ये नावे समाविष्ट, ५ नावे वगळणे, तसेच ७ दुय्यम रेशनकार्ड वितरण करण्यात आले. आरोग्य व महिला बालकल्याण विभागाकडून आयुष्मान कार्ड – २२, मातृवंदना योजनेचे २१ अर्ज, बेबी किट – २, तसेच आरोग्य तपासणी शिबिरात २० सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या.
ग्रामविकास विभागामार्फत ८-अ दाखले – ९, विवाह नोंदणी दाखले – ७, जन्म दाखले – ११, मृत्यू दाखले – ४ वितरित करण्यात आले. तसेच पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य करण्याच्या १३ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची महसूल व विविध शासकीय कामे त्वरित मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे ग्रामपंचायत सोनांबे सरपंच व ग्रामस्थानी सत्कार केला. वृक्ष मित्र परिवाराच्या वतीने मा. विभागीय आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
