
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
मुंबई चे प्रवेशद्वार, थंड हवेचे ठिकाण व सहयाद्रीच्या डोंगर रांगानीं नटलेले इगतपुरी शहर हे देश विदेशातील पर्यटकाचें दृष्टीने पसंतीचे ठिकाण असुन, या शहरात शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी मागणी इगतपुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. शालिनी संजय पा. खातळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
दरम्यान रा.कॉ.चे प्रदेश चिटणीस गोरख बोडके व शिवसेनेचे युवा नेते संजय पा.खातळे यांनीही या बाबत उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन इगतपुरी न.पा.चे मागणी संमत करण्याचे साकडे घातले आहे.
इगतपुरी शहर पावसाचे माहेरघर व थंड हवेचे ठिकाण म्हणुन ब्रिटिश काळापासुन प्रसिद्द आहे.इथला निसर्ग अत्यंत मोहक व पर्यटकानां वेड लावणारा आहे.
हे शहर मुंबई पासुन अत्यंत जवळ आहे. शिवाय तालुक्याचे शहर असुनही निसर्गाचे सान्निध्यात येथील शांतता कमालीची मोहक आहे.
जागतिक विपश्यना केंद्रामुळे येथे देश विदेशातील पर्यटकाचीं मोठी गर्दी सातत्याने असते.
या सगळया बाबी लक्षात घेऊन इगतपुरी शहराचे सौंदयात भर पडावी व भावी पिढी तसेच देश विदेशातील पर्यटकानां छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्राची माहिती व्हावी यासाठी येथे शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी मागणी करणेत आली आहे.
अर्थव्यवस्थेला गती मिळेल – बोडके
शिवसृष्टी चे रुपाने इगतपुरी शहराचे सौंदर्य वाढुन पर्यटनात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा दावा माजी जि प सदस्य तथा प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांनी केला.
सकारात्मक निर्णय घेऊ-उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे
इगतपुरी न.पा.च्या रास्त मागणीची महायुती सरकारने सकारात्मक दखल घेतली आहे.
आपण नक्कीच यावर योग्य ती कार्यवाही करु असे ठोस आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळीस दिले.
नगरपालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम होईल-खातळे पाटिल
इगतपुरी नगरपालिकेने मांडलेली शिवसृष्टीची कल्पना अति उत्तम असुन यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल व ती आर्थिक दृष्टीने सक्षम होईल असा दावा शिवसेना नेते संजय खातळे पाटिल यांनी केला.
