
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२१० वा दिवस
विशाल मनाचे शेकडो स्त्री-पुरुष भोग विलास आणि सुखाच्या इच्छेपासून दूर होऊन तन-मन-धनाने त्या कोट्यावधी भारतीयांच्या कल्याणासाठी प्राणपणाने प्रयत्न करतील, जे दारिद्र्य आणि अज्ञानाच्या खाईत खितपत पडलेले आहेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत जागृत होईल, भारताचे पुनर्निर्माण होईल. भारतातील आदर्शात त्याग आजही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च आहे. ही बुद्धाची भूमी आहे, रामानुजांची भूमी आहे, रामकृष्ण परमहंसांची भूमी आहे. त्यागाची भूमी आहे. ज्या भूमीने प्राचीन काळातील कर्मकांडांच्या विरुद्ध लढा दिला, वाद घातला आणि जिथे आजही असे शेकडो महापुरुष आहेत ज्यांनी सर्व विषयांचा त्याग केला असून जीवनमुक्त होऊन बसले आहेत. अशी भूमी आपले आदर्श कदापि सोडू शकत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २४ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १५ मार्च २०२६
★ पापमोचनी एकादशी 🚩🚩🚩🚩
★ १८६० प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचे शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा जन्मदिन.
★ जागतिक ग्राहक दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
