
सिन्नर दि. १४, (वार्ताहर) नाशिक येथील न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाचे कायदेविषयक जनजागृती शिबिर, पाथर्डी फाटा येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाले.
विद्यार्थी दशेत दैनंदिन जीवनात वावरताना माहिती असावेत असे व नेहमी उपयोगी येणारे कायदे व संबंधित विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
प्राचार्य डॉ. हरून रशीद कादरी, उपप्राचार्य एस. के. मांडवकर व प्रा. हेमा बुरुंग प्रा. नीता आटोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वी रित्या पार पडले. शिबिरात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या गणेश गायकवाड, मयुरी बर्वे, प्रसाद भावसार, ऋषिकेश भोर, रोहित आमले, शुभम आहेर, स्वाती करवंदे, सौरभ जगताप, गौरव अधिकार, प्रसन्न खाबिया, राहुल जाधव, आदी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना कायद्याशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्तम प्रतिसाद देत कायदेशीर बाबींविषयक सर्व मुद्दे शांतपणे समजून घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी मानवधन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, धनलक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य ज्योती कोल्हे आणि विठ्ठल जाधव यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन गणेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रसाद भावसार यांनी मानले.
