
नांदगाव ( प्रतिनिधी) अमरावती पुणे एक्सप्रेसला नांदगाव स्टेशनवर थांबा मिळावा याबाबतची मागणी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन नांदगाव तालुका पदाधिकारी आणि सदस्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. नांदगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात शिकत असून त्यांना जाण्या येण्यासाठी, तसेच इतर प्रवाशांसाठी अमरावती – पुणे ही एक्सप्रेस अत्यंत अनुकूल आहे. कारण या गाडीने जर विद्यार्थी नांदगाव वरून निघाल्यास तो अकरा वाजेपर्यंत पुण्याला पोहोचू शकतो. तसेच या गाडीला नांदगावला स्टॉप नसल्यामुळे सर्व प्रवाशांना मनमाडला जावे लागते या गाडीचे टाइमिंग मनमाडला पाच वाजून पंचवीस मिनिटांचा आहे. या गाडीला पकडण्यासाठी नांदगावला या वेळेत कोणतेही स्टेट ट्रान्सपोर्ट उपलब्ध नाही. म्हणून मनमाड पर्यंत हजार ते बाराशे रुपये खर्च करून प्रायव्हेट गाडीने जावे लागते. नंतर ही गाडी पकडावी लागते .तसेच मनमाड- पुणे थर्ड ईसीचे रिझर्वेशन ला सहाशे पंचवीस रुपये लागतात पण गाडी पकडण्यासाठी प्रायव्हेट गाडीला हजार ते बाराशे रुपये मोजावे लागतात त्यामुळे प्रवाशांना कारण नसताना आर्थिक दंड सोसावा लागतो त्यामुळे रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने या मागणीपत्राद्वारे अमरावती -पुणे ही रेल्वे नांदगाव स्टेशनला थांबा द्यावा आणि प्रवाशांची धावपळ थांबवावी अशी मागणी केली आहे.ही मागणी अमान्य केल्यास रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी नांदगाव पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार आहे व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे या निवेदनात रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रविण मधुकरजीगुप्ता यांनी म्हटले आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्ष रंगनाथ चव्हाण ,शहराध्यक्ष सागर महाजन यांची स्वाक्षरी आहे
