
कोपरगांव ( प्रतिनिधी )कोपरगाव ता.व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असो. च्या वतीने फिरत्या पाणपोई चे उदघाटन गुळाचे व्यापारी नरेशशेठ जोशी व व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी व्यापारी महासंघाचे संचालक महावीर सोनी, व्यापारी आशुतोष पटवर्धन, हर्षल जोशी आदींसह व्यापारी, आठवडे बाजारासाठी आलेले ग्राहक उपस्थित होते. कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन संस्थापक व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या
