
आ.हिरामण खोसकर यांची माहिती
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
आगामी कुंभमेळयाच्या पाश्वर्भुमीवर इगतपुरी – त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघात तीर्थक्षेत्राच्यां विकासकामापोटी महायुतीच्या सरकारने तब्बल ११२ कोटी रुपयाचा निधी मंजुर केला आहे.
इगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी ही माहिती दिली आहे.
इगतपुरी तालुक्यातील पुरातन काळी कुंभपर्वाचे स्थान मानल्या जाणार्या श्रीक्षेत्र कावनई तथा कपिलधारा तीर्थच्या मुलभुत विकासासाठी ३३ कोटी मंजुर करण्यात आले आहे.
तर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीतील जगद्गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानतंर्गत मुलभुत विकास कामासाठी तब्बल ५७ कोटी रुपयाचा निधी मंजुर केला आहे.
यांसह श्रीक्षेत्र चाकुर (बेझे) येथील चक्रतीर्थ पायाभुत सुविधासाठी तब्बल २२ कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्राच्यां विकासकामासह अन्य मुलभुत व पायाभुत सुविधासाठी ही शासन कोटयावधी रुपयाची कामे हाती घेत असुन या निमित्ताने मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेल असा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे.
निधी मंजुरी नंतर आमदार हिरामण खोसकर यांनी महायुती सरकारचेही आभार मानले आहे.
महायुती सरकार चे अभिनंदन- बोडके
आमदार हिरामण खोसकर यांनी प्रयत्नातुन मतदारसंघातील तीर्थक्षेत्राच्यां विकासकामापोटी तब्बल ११२ कोटी रुपयाचा निधी आणल्याबद्दल माजी जि.प.सदस्य तथा रा. कॉ.चे प्रदेश चिटणीस गोरख भाऊ बोडके यांनी महायुती सरकारचे व आमदार हिरामण खोसकर यांचेही अभिनंदन केले आहे.
