
नांदगाव (प्रतिनिधी,किरण काळे नांदगाव) :लिप फॉर वर्ड इंग्लिश प्रोग्राम २०२६ अंतर्गत स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
वर्ड पॉवर चॅम्पियन शिप तर्फे आयोजित इंग्लिश कॉम्पिटिशन २०२६ मध्ये शाळेतील इयत्ता २री (क)मधील एकूण ३०विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी २८विद्यार्थी तालुकास्तरीय परीक्षेमध्ये,तर २४ विदयार्थ्यांनी जिल्हास्तरीय परीक्षा मध्ये प्राविण्य मिळवले तर वंश किरण काळे ,आद्या संदेश गुप्ता,वेदांत भागवत गुरव ह्या 3 विदयार्थ्यांची राज्यस्तरिय परीक्षेसाठी निवड झाली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका . सौं. सुनीता जाधव सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी वर्ग यांनी केले.व राज्यस्तरीय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या या विदयार्थ्यांना शाळेतील शिक्षिका आशा सोनवणे ( शेवरे ) यांचे व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावर शाळेतील 3विदयार्थ्यांची निवड झाल्याने या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
