
नासिक =(.प्रतिनिधी ) संभाजी राजे यांचे कार्य हे आजच्या तरुण पिढी साठी प्रेरणादायी आहे असे विचार जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी काढले. सार्वजनिक वाचनालय येथे संभाजी राजे यांची पुण्य तिथी दिवस हा बलिदान दिवस म्हणुन साजरा होतो त्या प्रसंगी बोलताना सुहास टिपरे यांनी संभाजी राजे वर सिनेमा मध्ये भूमिका करणाऱ्या विकी कौशल यांचा लोकमत ने पुरस्कार देऊन सन्मान केला व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी संभाजी राजे यांची जिवंत भूमिका सकरणाऱ्या विकी कौशल चा विशेष उल्लेख करून संभाजी राजे यांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले. वाचनालय कार्याध्यक्ष संजय करंजकर, यांनी सुहास टिपरे यांचा भेट व पुष्प देऊन सन्मान केला नाट्य गृह सचिव जयेश बर्वे, अर्थ सचिव गिरीश नातू, सहाय्यक सचिव सोमनाथ मुठाळ सर, पुस्तकं मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली गिरीश नातू यांनी आभार मानले!!
