
सांजेगाव ता.इगतपुरी येथील प्रगतशील शेतकरी विष्णु पा. व देवराम (सर) गोवर्धने या दोघाच्या मातोश्री गं.भा.फुल्याबाई किसनराव पा. गोवर्धने यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
सांजेगाव हे तालुक्यातील राजकिय दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जागरुक गाव म्हणुन ओळखले जाते. इगतपुरी तालुक्याचे दिवंगत आमदार महर्षी पुंजाबाबा गोवर्धने याच गावचे.
याच गावच्या पाटिलकीचा भार कै. किसनराव पाटिल यांचेवर होता.जो त्यांनी समर्थपणे सांभाळला.
कै.गं.भा.फुल्याबाई या त्यांच्या अर्धागिंनी. त्यांनी कै.किसनराव या पतीच्या खांदयाला खांदा लावुन शेती व घर प्रपंच सांभाळला.
त्या अत्यंत मायाळु होत्या.अगत्यशील होत्या.घरी सतत गडी माणसे, नातेवाईक व लोकाचां राबता होता. न थकता त्यांनी सगळयाचांच नेहमी उत्तम पाहुणचार केला.
त्यांना तीन मुले व दोन मुली आहेत. पैकी विष्णु पाटिल व देवराम सर ही मुले आहेत.तर एका मुलाचे कै.बाबुराव (अप्पा) यांचे निधन झालेले आहे.
सर्वच मुले, नातवंडे कर्तबगार आहेत. परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणुन ते परिचित आहेत. काहि नातवंडे नौकरी, व्यवसाय करत आहेत. तर काहि परिवार पिंपळगाव घाडगा येथे राहतो आहे.
त्यांचे चिरंजीव देवराम (सर) हे राजकारण व समाजकारणात सक्रिय असुन, अत्यंत अभ्यासु, आक्रमक व लढावु नेते म्हणुन परिचित आहेत.
मातोश्री कै.गं.भा. फुल्याबाई या प्रदिर्घ काळ उत्तम रितीने जगल्या.त्यांना या निमित्ताने भावपुर्ण श्रद्धांजली.
लेखन- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी
