
लोहार समाजाचे राज्याचे नेते तथा
“कोकण विभागीय लोहार समाज संघ, मुंबई – महाराष्ट्र” चे अध्यक्ष गणेश राऊत
यांची भारतीय जनता पार्टीच्या ठाणे जिल्हा ग्रामिणच्या सरचिटणीसपदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.
त्यांचे या नियुक्ती बद्दल राज्यातील संपुर्ण लोहार समाजाने आनंद व्यक्त करत निवडीचे स्वागत केले आहे.
दरम्यान इगतपुरी तालुका लोहार समाजाचे वतीने राऊत यांचा ठाणे येथे सत्कार करणेत आला.
यावेळी बोलतानां राऊत यांनी पक्षाचे माध्यमातुन समाजासाठी भरीव काम करु.कधीही हाक मारा, मी मदतीस तत्पर आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी समाजाच्या विविध समस्याबाबत पदाधिकार्यानीं राऊत यांचेशी चर्चा केली.
इगतपुरी तालुका लोहार सुतार समाज संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक निवृत्ती राऊत, अंकुश तात्या बोराडे, गणेश बोराडे,दिनेश बोराडे, बाळासाहेब कान्हव,ओम बोराडे आदी समाज बांधव उपस्थित होते.
समाजाचा राऊत यांचे रुपाने सन्मान- गणेश बोराडे
गणेश राऊत यांना या पदाचे रुपाने भाजपाने सन्मानित केले असुन ही समाजासाठी गौरवाची बाब आहे.
समाजासाठी केंद्रातील मा.नरेंद्र मोदी व राज्यातील मा. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विश्वकर्माचे नावाने अनेकविध योजना चालवत असुन समाजाने याचा लाभ घ्यावा.यासाठी समाजाचे वरिष्छ नेते नक्कीच पाठबळ देतील असा विश्वास गणेश बोराडे यांनी व्यक्त केला.
