
नाशिक ( प्रतिनिधी )
उत्तर महाराष्ट्रातील साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या सूर्योदय सर्व समावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या रविवारी दिनांक 15 मार्च रोजी राज्यस्तरीय 23 वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पाथर्डी फाटा मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक शाळा मानवधन विद्यानगरी येथे शंकर बोराडे व्यासपीठावर हे संमेलन होणार आहे त्या संमेलना अंतर्गत संस्थेतर्फे काही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे त्यात साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे संपादक मा. रामदास नागवंशी यांना अक्षररत्न पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सूर्योदय काव्यरत्न पुरस्कार अविनाश पोईनकर, सूर्योदय गिरीजा कीर कथा पुरस्कार गोपाल शिरपूरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार खानदेशातील जेष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी( अमळनेर ) साप्ताहिक नगाराचे संपादक डॉ. विनोद गोरवाडकर, जेष्ठ पत्रकार सावळीराम तिदमे, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, प्रा.डॉ. संजीव गिरासे, (धुळे) प्रा. सुमन मुठे, (नाशिक) डॉ. प्रकाश कोल्हे, अड. मोहन शुक्ला, कवीश्री देवीदास खडताळे, प्रा. सतिश म्हस्के, लेखक कवी राजा (रवी) ठाकूर, कवी किरण भावसार, सप्तर्षी माळी, रमेश वाघ, अड. विलास मोरे, युवा कवी ऐश्वर्य पाटेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहाणार आहेत. रामदास नागवंशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
