
(- ज्ञानेश पिसे यांच्या लेखणीतून )
मनमाड वरून मुंबई व परतीचा प्रवास मुंबई ते मनमाड व्हाया नासिक असा पंचवटी एक्सप्रेस चा निरंतर प्रवास आहे.गेल्या 14 वर्षापासून या गाडीमध्ये इन्सानियत प्रवाहित होत आहे यंदाची डायमंड ग्रुप तर्फे इफतीयार पार्टी देखील
एकत्वाचे उत्तम उदाहरण आहे. सर्वधर्मसमभावाचे जतन करीत पंचवटी एक्सप्रेस मध्ये नवरात्र उत्सव,गणपती,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत आनंदाने साजरे होतात.
रेल्वेला धर्म नसतो रेल्वेला असते ती गती मानवतेच्या मार्गावर घेऊन जाणारी ही गती माणुसकीच्या प्रत्येक स्टेशनवर थांबा घेत प्रेम आणि एकत्व या स्टेशन कडे सतत अग्रेसर होत असते.पंचवटी आणि प्रवासी संघटना आणि सतत दिवस रात्र ये जा करणारे चाकरमाने यांच्या विश्वातील पंचवटी एक्सप्रेस हा एक अविभाज्य घटक आहे. कसारा घाटातून सकाळच्या सुंदर वातावरणात वळणे घेत पंचवटीचा प्रवास वळणदार होतो माणसाच्या भावभावनांना जोडणारी दुवा म्हणून पंचवटी एक्सप्रेसचे स्थान अग्रगण्य आहे. चाकरमानी आणि लोकांची लाडकी म्हणून पंचवटीला मान आहे. यंदा याच पंचवटीमध्ये इफतियार पार्टीची लगबग बघायला मिळाली.

खुदा ए इश्क म्हणत देवाला नमन करीत अमेरिका इराण युद्धबंदीची करुणा भाकत जनसामान्याच्या कल्याणासाठी “सबका भला करो करतार सब विध हो कल्याण” या पवित्र भावनेने युक्त होऊन डायमंड ग्रुपने अल्लाची प्रार्थना केली.
धर्म जोडता है तोडता नही याचा प्रत्येय पदोपदी पंचवटी एक्सप्रेस मध्ये येतो.जन्मा जन्मीचे रुळानुबंध असणारी, रेल्वेच्या रुळावरून धावणारी पंचवटी एक्सप्रेस ही शांतता आणि स्नेह या मार्गावरून कधी धावू लागली कळलेच नाही. पंचवटी एक्सप्रेस हा माणसाला माणसाशी माणूस म्हणून जोडणारा धागा आहे सुंदर भावनांचा, विविध संस्कृतीचा प्रवास रोजच एक्सप्रेस मधून होत असतो ज्याप्रमाणे रेल्वेची चाके ही समांतर धावतात अगदी त्याचप्रमाणे रेल्वेमधून या सर्व धर्मांची माणसं सतत समांतर प्रवास करत असतात आणि माणूसपणाच्या सर्वच गोष्टी तंतोतंत जुळवून आल्यामुळे प्रवास सुखकर होतो परिसर समृद्ध होतो आणि जगण्याचा आनंद इथल्या वाऱ्या संगे वाहतो ट्रेन ही कधीच निर्जीव नसते माणसांच्या राबत्याने सतत ती सजीव होत असते तिचे येणे जाणे चिरंतन असते जसं काही
ओळी मला सुचल्या
“हमारी ये पंचवटी एक्सप्रेस मानवता का आसरा आहे. एकत्व और खुशाहाली की वसुंधरा है!
यह ट्रेन नही केवल इन्सानियत का एक नजारा है!
पंचवटी एक्सप्रेस चा प्रवास हा माणसाकडून माणसाकडे होत आहे या सर्व माणसांना या सर्व प्रवाशांना रमजान पर्वाच्या शुभेच्छा. आपण सतत आनंदी राहा, चैतन्यामध्ये बहरत रहा या देशाच्या प्रगतीसाठी सर्वधर्मसमभाव ही भावना आपुलकीची भावना जतन करून आम्ही सतत राबत असू आणि आपल्याला सेवा देत राहू धन्यवाद!
