
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख मुजम्मील):
विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) आणि पोलीस अधीक्षकांचा (SP) दौरा होऊनही मटका माफियांचे धाबे दणाणण्याऐजी त्यांचे बळ वाढलेले दिसत आहे. बड्या साहेबांनी कडक आदेश देऊनही तालुक्यात मटका खुलेआम सुरू असून, “या माफियांना नेमकी कोणाची अदृश्य ताकद मिळतेय?” असा सवाल आता संतप्त जनता विचारत आहे.
संसाराची होळी आणि मटक्याची ‘इबादत’
घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असली तरी चालेल, पण मटक्याची वेळ झाली की एखाद्या ‘इबादती’सारखी धाव घेणाऱ्या तळीरामांमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. सर्वात भयानक म्हणजे, आज बाप मटका खेळतोय आणि उद्या त्याचा मुलगाही (लेक) याच दलदलीत ओढला जाणार, मग देशाचे भविष्य कुठे जाणार? असा उद्विग्न प्रश्न महिला विचारत आहेत.
कष्टकऱ्यांचा घाम मटका चालक ओरबाडून घेत असून, आज पकडलेली ‘चिठ्ठी’ उद्या पुन्हा सुरू होणार नाही याची शाश्वती प्रशासन देणार का? वरिष्ठांच्या दौऱ्याचा प्रभाव केवळ कागदावरच राहिला असून, जमिनीवर मात्र मटका माफियांचीच सत्ता दिसत आहे.
प्रमुख प्रश्न: बापापाठोपाठ लेकही जुगाराकडे वळला, तर घरांचे काय होणार?
मागणी: मटका किंगवर कठोर कारवाई करून पुढची पिढी वाचविण्याची मागनी पुर्ण तालुक्यातील नागरिकाकडून होत आहे.
