
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
शासकिय लेखा परिक्षण आधिकारी तथा इगतपुरी तालुक्याचे भुमिपुत्र
श्री विष्णू पा. त्र्यंबकराव वारुंगसे यांची वणी गडाचे आई सप्तश्रृंगी निवासनी देवीच्या संस्थानचे विश्वस्त पदी शासन आदेशाने नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आई सप्तश्रृंगी चे वणी गड संस्थानावर विश्वस्तपदी नियुक्ती होण्याचा बहुमान प्रथमच इगतपुरी तालुक्यास वारुंगसे पाटलाचें रुपाने मिळाला आहे.
वारुंगसे पाटलाच्यां या नियुक्ती बद्दल इगतपुरी तालुक्यातील सर्वच स्तरातुन जोरदार स्वागत करणेत आले आहे.
बेलगाव तर्हाळे हे त्यांचे गाव असुन, राष्ट्रवादी काँग्रेस इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा वारुंगसे यांचे ते बंधु आहेत.
सेवेची संधी मिळाली हे मोठे भाग्य- वारुंगसे पाटिल
आई सप्तश्रृंगी देवीचे वाणी गड निवासिनी संस्थानचे विश्वस्तपदी नियुक्ती म्हंणजे आई सप्तश्रृंगी देवीचे सेवेची संधी मिळाली आहे. आपण या संधीचे नक्कीच सोने करु अशी ग्वाही शासकिय लेखा परिक्षक आधिकारी तथा नव नियुक्त विश्वस्त विष्णु पाटिल वारुंगसे यांनी दिली.
