
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०८ वा दिवस
श्रेष्ठतम वीरवृत्ती म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांची निःस्वार्थपणे सेवा करणे, नेहमी संयमी वृत्ती बाळगणे. कोणत्याही परिस्थितीत क्रोधीत न होता, संयमी जीवन जगणे होय. वीरवृत्ती म्हणजे निःशेष आत्मसमर्पण ! आपल्या क्रोधावर विजय मिळवणे हे सर्वात महान वीराचे आभूषण आहे. आज्ञा होताच पुढे सरसावून इष्ट कार्यासाठी स्वतःच्या प्राणार्पणासाठी सदैव सिद्ध असणारा नेताच इतरांना जीवन समर्पण करण्याची आज्ञा देऊ शकतो. प्रथमतः स्वतः आत्मसमर्पण केले पाहिजे. तदनंतरच इतरांना उपदेश करण्याचा अधिकार आपणास प्राप्त होतो. जो अंतःकरणपूर्वक सर्वांचा होऊ शकतो, तोच खरा वीर नेता होय.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन २२ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १३ मार्च २०२६
★ १८०० पेशव्यांच्या दरबारात असणारे मराठा साम्राज्यातील, मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यापैकी अर्धे शहाणे बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांचा स्मृतीदिन
★ १९४० अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
