
मूळडोंगरी ( प्रतिनिधी) सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे शौर्य ,त्याग आणि स्वाभिमानाचे आठवण करून देणारे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिव श्री सिद्धांत दादा राठोड, तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

बलिदान दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती महाजन मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सन १६८९ मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडले त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्माचा आणि स्वाभिमानाचा त्याग करण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना अत्यंत क्रूर यातना देऊन ११ मार्च१६८९ रोजी शहीद केले या छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. या बलिदान दिनानिमित्त यावेळी संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष, सचिव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
