
सिन्नर (प्रतिनिधी ) १० मार्च २०२६ ज्ञानज्योती साविञीमाई फुले यांच्या १२९ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे नगरपालिकेच्या प्रवेशद्वार जवळ ज्ञानज्योती साविञीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका सावित्रीमाई जोतीराव फुले . . स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात त्या काळात सावित्रीबाई यांचा जन्म झाला. सावित्रीमाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीमाईना ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनी मोठी कामगिरी बजावली.. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीमाईनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता व सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीमाई फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीमाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला अशा महान विद्येच्या ख-या देवता साविञीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन रामचंद्र नरोटे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार आर एन जाधव यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,आर एन जाधव, रामचंद्र नरोटे भुषण मोरे किरण मुठे शाम डांगे आकाश धोंगडे मेहनाज गाजी खुशनाहर गाजी शाभा खुळे सरला देशमुख आदि उपस्थित होते
