
सिन्नर (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण मुत्सद्दी,सुसंस्कृत व आदर्श राजकारणी होते. त्यांचे कार्य आजच्या काळात दिशादर्शक आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि: शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. येथील पंचायत समितीच्या आवारात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महामित्र दत्ता वायचळे होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सिन्नर तालुका पंचायत समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांचे विचार प्रेरणादायी असून ते आत्मसात करण्याची गरज आहे.महामित्र दत्ता वायचळे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून संस्मरणीय कार्य केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत तसेच देशाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता असे प्रतिपादन केले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी विजयकुमार ढवळे,नीलेश भुजाळ,कैलास आव्हाड,अविनाश सहाणे,सचिन उगले,संजय दुसाने,महेश साळी,रुपाली जाधव,पूनम शिंदे, गीतांजली बेनके,रंजिता ठाकरे,दीपांजली देशमुख,स्वाती सरवार, ज्योती पवार,शारदा आव्हाड,आशिष भोसले, स्नेहा शेळके अजिंक्य होणमुटे,धीरज जाधव,बापू खैरे,सुशांत पांगारकर,कल्याणी जाधव आदी उपस्थित होते.
