
हिमायतनगर प्रतिनिधी शेख मुजम्मील
किनवट तालुका हा डोंगराळ भागात वसलेला असून येथे गोरगरीब शेतकरी शेतीद्वारे आपला उदरनिर्वाह करत असतात
जंगल भाग असून यावरही अनेक वेळेस जंगली प्राण्यांनचे संकट असते

यालाच पुष्टी देणारी घटना काल रात्री मलकाजम येथील शेतकरी गणपत गगन्ना जंगितवाड शेत सर्वे नंबर 455 येथे घडली यांच्या शेतात रब्बी पीक पेरणी करून मका लागवड केली होती या लागवडीस सुमारे तीन महिने झाले होते ऐन पिक हाताला येण्याच्या तोंडाला जंगली प्राणी माकड नीलगाय डुक्कर आदी जनावरांनी शेतात धुमाकुळ घालत मक्याचे नुकसान केले यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीचे वेळ आले आहे

यातून न्याय देण्याची मागणी शेतकरी गणपत गगन्ना जंगितवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे
